milk dairy in maharashtra :
नमस्कार शेतकरी मित्रांनो आता प्रति लिटर दुधा मागे पाच रुपये अनुदान मिळणार आहे तर मित्रांनो ते अनुदान कशाप्रकारे मिळणार आहे ही सर्व माहिती पाहण्यासाठी तुम्ही पुढील लेख संपूर्ण नक्की वाचा .
सहकारी दूध संगमार्फत संकलित होणाऱ्या गाईच्या दुधाकरिता दूध उत्पादकास प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्यात येईल अशी घोषणा दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे ही योजना राज्यातील फक्त सहकारी दूध उत्पादक संस्था मार्फत राबविण्यात येईल. विखे पाटील यांनी याबाबत विधानसभेत निवेदन दिले दूध व दुग्धजन्य पदार्थांचे भाव प्रामुख्याने मागणी व पुरवठा आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील दूध भुकटी व बटरचे दर यावर अवलंबून असतात.
त्यानुसार आंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटीवर बटरचे दर कमी झाल्यास दुधाचे दर कमी होतात राज्यातील शेतकऱ्यांची आर्थिक हित जोपासण्यासाठी त्यांना योग्य न्याय देण्याचा निर्णय घेण्यात आला असून लवकरच शासन निर्णय काढण्यात येईल असे ते म्हणाले.
यासाठी अटी पुढील प्रमाणे आहेत:-
योजना 1 जानेवारी 2024 ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीसाठी लागू राहील त्यानंतर आवश्यकतेनुसार आढावा घेऊन मुदतवाढ देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.
सहकारी दूध संघाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर किमान 29 रुपये दूध दर संबंधित दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी वैयक्तिक बँक खात्यावर ऑनलाईन पद्धतीने अदा करणे बंधनकारक राहील त्यानंतर शेतकऱ्यांना शासनामार्फत पाच रुपये प्रति लिटर बँक खात्यावर जमा करण्यात येईल.
डीबीटी करण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे बँक खाते हे त्यांच्या आधार कार्डची व पशुधनाच्या आधार कार्ड ची लिंक असणे आवश्यक असेल व त्याची पडताळणी करणे आवश्यक राहील.