state bank recruitment :
नमस्कार मित्रांनो तुम्ही पदवीधर असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तर मित्रांनो भारतीय स्टेट बँके तील असोसिएट भरती परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाली असून त्यामध्ये 8 हजार 283 जागांची भरती केली जाणार आहे.
यासाठी पात्रता पुढील प्रमाणे :
- कोणत्याही शाखेतील पदवीधर विद्यार्थी भरतीसाठी पात्र ठरू शकतो.
अर्ज करण्याची अंतिम मुदत 7 डिसेंबर पर्यंत आहे. भरती परीक्षा ऑनलाइन पद्धतीने राष्ट्रीय पातळीवर घेतली जाणार असून ती बहू पर्यायी स्वरूपाची असेल या परीक्षेसाठी इंग्रजी व हिंदी बरोबरच मराठी माध्यम ही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
स्टेट बँकेच्या विविध राज्यातील विविध शाखांमध्ये कस्टमर सपोर्ट अँड सेल्स या विभागासाठी ज्युनिअर असोसिएट तथा लिपिक या पदासाठी एकूण 8283 जागांसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे.
यामध्ये अनुसूचित जातीसाठी 1284 , अनुसूचित जमातीसाठी 748, इतर मागास प्रवर्गासाठी 1919, आर्थिक मागास प्रवर्गासाठी 817 तर खुल्या प्रवर्गासाठी 3515 उमेदवारांची भरती केली जाणार आहे.
- एकूण पदे : 8283
- शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेचा पदवीधर
- पूर्व परीक्षा 100 गुण : जानेवारी 2024
- मुख्य परीक्षा 200 गुण : फेब्रुवारी 2024