फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

सर्वप्रथम अर्जदाराच्या काही जबाबदाऱ्या शासन निर्णयामध्ये सादर केलेले आहेत ते बघूया
  •  प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत अर्जदारांनी खालील प्रकारचा जबाबदारी पार पाडाव्यात.
  • केंद्र शासनाच्या पोर्टलवर अर्जदाराने नोंदणी करणे गरजेचे आहे किंवा अर्जदार तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्फत किंवा सामूहिक सुविधा केंद्र म्हणजे सीएससी पोर्टल वरती नोंदणी करू शकतो.
  • अर्जदाराला ई-केवायसी करणं आवश्यक आहे.
  • अर्जदाराला त्यांचा आधार क्रमांक ची बँक लिंक करणे आवश्यक आहे.
  • यावेळी शासन वेळोवेळी ज्या सूचना देईल त्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.

फॉर्म भरताना काही अडचण आल्यास कोणाकडे जावे:

शेतकरी बंधूंनो यापूर्वी आपल्याला जर पीएम किसान योजनेत काही अडचण निर्माण झाले तर आपण कोणाकडे जाऊ आणि याची मदत मागावी याबद्दल माहिती शासनाकडे उपलब्ध नव्हती किंवा कोणताच अधिकारी आपल्या योग्य अशी माहिती सादर करत नव्हता परंतु आता शासनाने कृषी विभाग महसूल विभाग व ग्राम विकास विभाग यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या निवडून दिलेले आहेत आपल्याला समस्याचे निवारण करण्यासाठी या तीनही विभागांमध्ये आपण जाऊन आपल्या समस्या दूर करू शकतात. त्यासाठी कोणतेही मदत कोणाकडे मागावे त्यासाठी शासन निर्णय सर्वात शेवटी सादर केलेल्या सर्व माहिती उपलब्ध आहे

पी एम किसान नोंदणी करण्याची कार्यपद्धती कशी आहे ती जाणून घेऊया:

  • नवीन अर्जदाराची पीएम किसान पोर्टलवर अर्ज दाखल करणे नोंदणी करण्याने पात्र लाभार्थ्यांना पोर्टलवर नोंदणी प्राप्त करण्याबाबत साठी खालील बाबी निश्चित करण्यात येत आहेत.
  • अर्जदार यांनी केंद्र शासनाच्या पोर्टलवर स्वय नोंदणी करावी अथवा तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्फत नोंदणी करावी किंवा आपण सीएससीच्या माध्यमातून देखील नोंदणी करू शकतात.
  • पीएम पोर्टलवर नोंदणी केलेल्या तालुकास्तरावर थेट नोंदणी केलेल्या अर्जदाराची माहिती जमीन धरणाच्या अनुषंगाने पडताळणी करण्यासाठी तहसीलदार यांना तालुका कृषी अधिकारी उपलब्ध करून देतील.
  • यानंतर तालुका अधिक कृषीअधिकारी व तहसीलदार यांच्या मार्फत आपले सर्व पडताळनी चेक केली जाईल.
  • त्यानंतर जिल्हा कृषी अधिकारी क्षेत्रीय कार्यालयामार्फत लाभार्थ्यांची सर्व माहिती योग्य आहे याची पडताळणी केल्याचा आणि पडताळणी केल्याचा नंतर सादर माहिती पुन्हा बरोबर असायची खात्री जमा झाल्याच्या नंतर आयुक्त कृषी यांच्या स्तरावरती राज्यस्तरीय लॉगिन मध्ये उपलब्ध झाल्यावरती त्या ठिकाणी राज्यस्तरीय मान्यता देण्यात येईल आणि मगच आपल्याला यामध्ये लाभ मिळणार आहे.
  • एकंदरीत आपण जर फॉर्म भरला तर सर्वप्रथम फॉर्मंची पावती आपल्याकडे उपलब्ध असेल.
  • त्यानंतर सर्व माहिती तालुका कृषी अधिकारी व तहसील कार्यालय यांच्याकडून चेक केले जाईल.
  • त्यांनी चेक केल्याच्या नंतर सर्व माहिती जिल्हा कृषीअधिकारी यांच्याकडे सादर केली जाईल.
  •  जिल्हा कृषी अधिकारी सर्व माहिती बरोबर आहे का हे खात्री करून राज्य कृषी आयुक्त यांच्याकडे सादर करेल आणि त्यांच्याकडून मान्यता आल्यानंतर आपल्याला पी एम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे सुरू होणार आहेत.

फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  •  बँक पासबुक
  • सातबारा
  • आठ अ उतारा
  • रेशन कार्ड
  • फेरफार
  • मोबाईल नंबर