jan aushadhi kendra online : येथे पहा संपूर्ण माहिती

jan aushadhi kendra online :

 

नमस्कार मित्रांनो तुम्हाला जर औषध केंद्र सुरू करायचे असेल तर तुम्ही पुढील लेख संपूर्ण नक्की वाचा.

तर मित्रांनो मोठ्या औषध कंपन्यांकडून ब्रँडच्या नावाखाली नागरिकांची होत असलेली आर्थिक लुबाडणूक थांबवण्यासाठी केंद्र सरकारने जेनेरिक औषधांना मोठ्या प्रमाणात पुरस्कार करणे सुरू केले आहे. यातून प्रंतप्रधान भारतीय जन औषधी केंद्राची संकल्पना पुढे आली. यातून सर्वसामान्यांना स्वस्तातील जेनेरिक औषधे उपलब्ध करून दिली जातात, तसेच तरुणांनाही आर्थिक स्वावलंबनाचा चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. मार्च 2024 पर्यंत देशभरात जन औषधी केंद्राची संख्या दहा हजारांपर्यंत वाढविण्याचे लक्ष सरकारने समोर ठेवले आहे.

यासाठी फार्मसीस्ट तसेच नोंदणीकृत डॉक्टर जन औषधी केंद्र सुरू करू शकतात.

एखादी स्वयंसेवी संस्था, ट्रस्ट, खाजगी हॉस्पिटल आधी संस्था जन औषधी केंद्र सुरू करू शकतात.

यामध्ये चालकांना पुढील प्रमाणे लाभ होतो.

  • दुकानासाठी लागणारी फर्निचर आदी साहित्य खरेदीसाठी सरकारकडून  दीड लाखापर्यंत मदत केली जाते. बिलिंग साठी लागणारा कॉम्प्युटर आणि प्रिंटर खरेदीसाठी पन्नास हजार रुपयांची मदत केली जाते.
  • अर्जदार जर अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग तसेच दिव्यांग असेल तर केंद्र सुरू करण्यासाठी 50 हजारांची रक्कम  आगाऊ दिली जाते.

 

केंद्र सुरू करणाऱ्या व्यक्तीकडे डी. फार्मसी ची पदविका किंवा बी. फार्मसी ची पदवी असावी.

केंद्र सुरू करण्यासाठी सर्वप्रथम किरकोळ औषध विक्रीसाठी परवाना काढावा लागतो प्रक्रिया पूर्ततेसाठी https://janaushadhi.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन अर्ज डाऊनलोड करता येतो.

 

अशीच विविध माहिती पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपलाजॉईन करा .. 

Leave a Comment