खालील कागदपत्रे तपासण्यात येणार.
, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी खासरा पत्रक, पाहणी पत्रक, क-पत्रक, कुळ नोंदवही, नागरिकांचे राष्ट्रीय रजिस्टर सन 1951, नमुना नं. 1 हक्क नोंद पत्रक, नमुना नं. 02 हक्क नोंद पत्रक आणि सातबारा उतारा हे महसुली अभिलेखे तपासली जाणार आहेत. जन्म-मृत्यू नोंद रजिस्टर (गाव नमुना 14), शैक्षणिक अभिलेख्यामध्ये प्रवेश निर्गम नोंदवही / जनरल रजिस्टर, रेल्वे पोलिस विभागाकडील गुन्ह्याबाबतच्या नोंदी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्याकडील माजी सैनिक निवृत्तीनंतर नोंदणीकरिता करण्यात आलेली कागदपत्रे, जिल्हा वक्फ अधिकारी यांच्याकडील मुतखब, 1967 पूर्वीचे अधिकारी-कर्मचाऱ्यांचे सेवापुस्तक, महानगरपालिका आणि नगरपालिकेकडील शेतवार तक्ता वसूल व आमदनी नोंदवही आणि सैन्य भरती कार्यालयाकडील सैन्य भरतीच्यावेळी घेतलेल्या नोंदी तपासण्यात येतील.
सहायक जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्याकडील खरेदीखत नोंदणी केलेले रजिस्टर, डे-बुक, करार खत, साठेखत, इसारा पावती, भाडे चिठ्ठी, ठोके पत्र, बटाई पत्र, दत्तक विधान, मृत्युपत्र, इच्छापत्र, तडजोड पत्र व इतर दस्त तपासण्यात येतील. भूमी अभिलेख विभागाकडील पक्का बुक, शेतवार पत्रक, वसुली बाकी, उल्ला प्रतिबुक, रिव्हीजन प्रतिबुक, क्लासर रजिस्टर, हक्क नोंदणी पत्रक, नमुना-33, नमुना-34 आणि टिपण बुक तपासण्यात येणार येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.