lek ladki yojana maharashtra :-
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली महाराष्ट्र लेक लाडकी योजना ही एक योजना आहे ज्या अंतर्गत गरिबांनी आर्थिक दृष्ट्या मागास कुटुंबातील मुलींना महाराष्ट्र शासनाकडून एक लाख एक हजार रुपये आर्थिक मदत दिली जाईल ही योजना महाराष्ट्रातील सर्व गरीब मुलींसाठी वरदान ठरणार आहे.
अंतर्गत गरीब पात्र मुलींना अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर 75 हजार रुपयांची रोख रक्कम दिली जाणार आहे मुलीच्या जन्मापासून ते शिक्षणापर्यंत पाच हप्त्यांमध्ये सरकारकडून आर्थिक मदत दिली जाईल आर्थिक मदतीची रक्कम मिळाल्यानंतर मुलीच्या शिक्षणात कोणतीही अडचण येणार नाही त्यामुळे समाजातील मुलीबद्दलची नकारात्मकता विचारसरणी बदलून मुलगी जन्मली घरी धनसंपत्ती आली या पद्धतीने फायदा होणार आहे.
यामध्ये 1 एप्रिल नंतर जन्मलेली मुलगी पात्र ठरणार आहे.
रक्कम पुढील प्रमाणे मिळणार आहे.
मुलीचा जन्म झाल्यावर 5000 रक्कम मिळणार आहे.
पहिली वर्गात प्रवेश घेण्यासाठी 6
हजार रुपये मिळणार आहे.
सहाव्या वर्गात प्रवेश घेतल्यावर 7 हजार रुपये रक्कम मिळणार आहे.
अकरावी मध्ये प्रवेश घेण्यासाठी आठ हजार रुपये मिळणार आहे .
मुलगी 18 वर्षाची झाल्यावर 75 हजार रक्कम मिळणार आहे.
- यासाठी कागदपत्रे पुढीलप्रमाणे लागणार आहेत.
- पिवळ्या किंवा केशरी शिधापत्रिका.
- मुलीच्या पालकांच्या आधार कार्ड.
- पालकासह मुलीचा फोटो.
- अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो.
- पत्त्याचा पुरावा .
- उत्पन्न प्रमाणपत्र.
- मोबाईल नंबर.
- बँक पासबुक
यासाठी अर्ज तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडे करायचा आहे.