Namo shetkari Yojana Gr

मा. वित्त मंत्री महोदयांचे सन 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्न वाढीसाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी “नमो शेतकरी महा सन्मान निधी” ही योजना राबवण्याबाबतची घोषणा केलेली आहे. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी ( PM-KISAN ) योजनेच्या धर्तीवर “नमो शेतकरी महा सन्मान निधी” ही योजना राज्यात राबविण्याबाबतचा प्रस्तावास दिनांक 30.05. 2023 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. त्यास अनुलक्षून शासन पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे….

Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana

सन 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्न वाढीसाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना सन 2023-24 पासून खालील प्रमाणे राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे .

1.Namo Shetkari Yojana लाभार्थी पात्रता व निकष

सदर योजने करिता केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्रमाण म्हणून गृहीत धरण्यात याव्यात.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पीएम किसान पोर्टलवर नोंदणी केलेले व केंद्र शासनाच्या निकषानुसार लाभास पात्र ठरलेले सर्व लाभार्थी नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या लाभासाठी पात्र राहतील.

केंद्र शासनाने लाभार्थी पात्रतेबाबत वेळोवेळी निकषांमध्ये केलेले बदल तात्काळ परीणामाने नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना देखील लागू होतील.

या बदलाकरिता महाराष्ट्र शासनाकडून वेगळा शासन निर्णय निर्गमित करण्याची आवश्यकता राहणार नाही.

पी एम किसान पोर्टलवर नव्याने नोंदणी होऊन लाभ मिळालेले पात्र लाभार्थी देखील या योजनेचे लाभार्थी राहतील.

Namo Shetkari Yojana योजनेची कार्यपद्धती

PM किसान योजनेच्या PFMS प्रणालीनुसार प्रत्येक हप्ता वितरणावेळी लाभास पात्र ठरलेले लाभार्थी नमो शेतकरी महा सन्माननिधी योजनेच्या लाभासाठी पात्र राहतील.

सदर लाभार्थ्यांना राज्य शासनामार्फत विकसित करण्यात येणाऱ्या पोर्टलवरून प्रणाली वरून बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे निधी जमा केला जाईल.

नमो शेतकरी योजनेचा शासन निर्णय बघण्यासाठी येथे क्लिक करा