old pension Yojana maharashtra :
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या जाहिरातीनुसार नंतर रुजू झालेला अंदाज फायदा .
सन 2005 पासून राज्यात नवी पेन्शन योजना लागू झाली त्यामुळे 2005 नंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू नाही या सर्व कर्मचाऱ्यांना सरकार जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी हिवाळी अधिवेशनाच्या काळात मोर्चा काढला होता.
या निर्णयानुसार पात्र ठरणाऱ्या शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना जुना निवृत्तीवेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय शासन निर्णय प्रसिद्ध झाल्यापासून सहा महिन्यांच्या कालावधीत देणे बंधनकारक आहे जे राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी या सहा महिन्यांच्या कालावधीत जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा पर्याय देणार नाहीत त्यांना नवीन पेन्शन योजना लागू राहील तसेच अधिकारी व कर्मचारी यांनी प्रथम दिलेला अंतिम राहणार आहे.