pipeline anudan yojana maharashtra :
नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतीसाठी पाणी किती महत्वाची आहे, हे तुम्हाला सर्वांना नक्कीच माहिती आहे. आजकालच्या कुठल्याही शेतकऱ्याला वाटते की आपल्या शेतामध्ये पाण्याची सोय असावी, आपली शेती संपूर्ण बागायती असावी ,जेणेकरून आपल्याला चांगले उत्पन्न मिळेल.
शेती बागायती असेल तर उत्पादन वाढते त्यामुळे शासन सुद्धा शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असते, ज्यामध्ये आपल्याला शेतीसाठी पीव्हीसी पाईपलाईन करण्यासाठी योजना सुद्धा आहे. ही योजना MAHADBT पोर्टलच्या माध्यमातून शासनाकडून राबवली जाते,आपण आज याच योजनेविषयी माहिती घेणार आहोत. संपूर्ण माहिती पाहण्यासाठी तुम्ही हा लेख नक्की वाचा.
महाराष्ट्र राज्य सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या पाईपलाईन अनुदान योजनेसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्याला शासनाकडून 50 टक्के अनुदान दिले जाते, हे अनुदान जास्तीत जास्त 15 हजारापर्यंत देण्यात येते.
तर शेतकरी बंधूंनो तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ घ्या व 50 टक्के अनुदान मिळवा.
या योजनेसाठी आपल्याला कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, ते आपण पाहूयात.
आधार कार्ड
बँक पासबुक
सातबारा उतारा व आठ अ
पाईप खरेदी केल्याची बिल
इत्यादी कागदपत्रे आपल्याला आवश्यक असतील.