Ration Card Maharashtra :
नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्या साठी नवीन योजनेची माहिती घेऊन आलो आहोत तर मित्रांनो आपल्याला रेशन कार्ड बरोबर धान्य भेटते परंतु आपल्याला आता वर्षातून एक वेळा साडी भेटणार आहे. राज्य सरकारच्या वस्त्र विभागांनी हा निर्णय घेतला आहे.
तर मित्रांनो रेशन धारकांना राज्य शासनाने निश्चित केलेल्या सनादिवशी साडी वर्षातून एकदा मिळणार आहे ही योजना पाच वर्षे चालणार आहे.
एक साडी 355 रुपयांची असून ती रेशन धारकांना मोफत मिळणार आहे.
या योजनेसाठी साड्यांचे उत्पादन, वाहतूक ,जाहिरात ,साठवणूक ,हमाली, यासाठीचा सर्व येणारा खर्च महामंडळाला राज्य शासनाकडून दिला जाणार आहे.
ही योजना पाच वर्षांसाठी आहे. म्हणजेच ही योजना 2023 ते 2018 पर्यंत चालणारी योजना आहे असे राज्य शासनाने निश्चित केली आहे.
राज्यात रेशन धारकांची संख्या 24 लाख 58 हजार 747 इतकी आहे. यातील सर्व कुटुंबीयांना एक वर्षाला एक साडी मोफत वाटण्यात येणार आहे.