Varas Nond Online Maharashtra वारसदारांची नोंद करा आता ऑनलाईन.

Varas Nond Online Maharashtra :

 

नमस्कार मित्रांनो आपण आज एक नवीन योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत त्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.                                                                   आपल्याला जर वारसदारांची नोंद करायची असेल तर ति नोंद कशा पद्धतीने करायची. याबद्दलची सर्व माहिती आपण आजच्या या लेखा मध्ये पाहणार आहोत. यासाठी तुम्ही हा लेख संपूर्ण नक्की वाचा.

Varas Nond Online Maharashtra :

तर मित्रांनो आपल्याला वारस नोंद करायची गरज तेव्हा पडते की जेव्हा आपल्या कुटुंबातील मुख्य सदस्याचे निधन होते. त्या वारसदारांची नोंद घेण्यासाठी तलाठी कार्यालयामध्ये जावे लागत होते पण आता आपण वारसदारांची नोंद घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने करू शकतो

महाराष्ट्र मध्ये एक ऑगस्ट हा महसूल दिन साजरा केला जातो तसेच एक ते सात ऑगस्ट 2023 मध्ये महसूल सप्ताह साजरा करण्याचा शासन निर्णय Online Varas Nond Maharashtra करण्यात आला होता. याच निमित्ताने एक ऑगस्ट पासून भूमी अभिलेख विभागाने राज्यभर ही सुविधा अमलात आणली

Varas Nond Online :

https://pdeigr.maharashtra.gov.in/या वेबसाईटवर भेट देऊन लॉगिन करा.

अर्ज केल्यानंतर पुढे तो गावाच्या तलाठ्याकडेच ऑनलाईन पद्धतीने जाईल.

पुढे तुमचा अर्ज पडताळला जाईल. या पडताळणी मध्ये काही चूक आढळली किंवा कोणती कागदपत्रे अपूर्ण असतील तर त्याची माहिती अर्ज करणाऱ्याला मेलद्वारे कळविण्यात येईल.

असे झाल्यास त्यामध्ये दुरुस्त करून तुम्ही पुन्हा अर्ज पाठवू शकता.

आणि जर तुमची कागदपत्रे अगदी पूर्णपणे व्यवस्थित असतील तर तलाठ्यांकडून त्याची नोंद ऑनलाइन पद्धतीने सातबारा उताऱ्यावर करून घेण्यात येईल

Leave a Comment