Vihir anudan yojana :
नमस्कार मित्रांनो महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्ग सिंचन विहिरी साठी आता 3 ऐवजी 4 लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे, यासाठी जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 1 हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. येत्या अर्जाची स्वीकृती बाबत येत्या महिन्यामध्ये यावर कार्यवाही होऊन विहिरीच्या खोदायचे काम सुरू होणार आहे सर्वाधिक 211 अर्ज भोर तालुक्यातून आले आहेत याव्यतिरिक्त जिल्ह्यात दहा हजार 741 कामे मंजूर केली आहेत.
राज्य सरकारने 4 नोव्हेंबर रोजी शासन निर्णयानुसार विहिरींसाठी तीन लाखा ऐवजी चार लाख रुपये देण्याचे निर्णय जारी केला आहे. यासाठी 100% अनुदान देण्यात येत आहे वैयक्तिक लाभाच्या योजनेतून शेतकऱ्यांना जॉब कार्ड काढून या योजनेचा लाभ घेता येतो जिल्ह्यात यासाठी प्रत्येक गावासाठी किमान 15 विहिरींची उद्दिष्टे देण्यात आले आहे.
हे पण वाचा :- तुम्हाला जर जॉब कार्ड काढायचे असेल तर तुम्ही येथे क्लिक करा.
या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी ग्रामपंचायत येथे जॉब कार्ड काढावे लागेल तसेच घरातील सदस्यांच्या नावे हित असे कार्ड काढता येते या योजनेच्या अन्य योजनांचाही लाभ घेता येतो विहिरीच्या योजनेसह जिल्ह्यात सुमारे दहा हजार 741 कामांना मंजुरी देण्यात आली आहे त्याचाही लाभ नागरिकांनी घ्यावा.
अशीच विविध माहिती पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला नक्की जॉईन करा..