education loan :
नमस्कार मित्रांनो मराठा मुलांना चाळीस लाखापर्यंत शैक्षणिक कर्जावर व्याज माफ होणार आहे.
मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी 40 लाख रुपयांची व्याजमाफी शैक्षणिक कर्ज योजना आणण्याचा निर्णय अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने घेतला आहे या विषयासंदर्भातील शासन निर्णय लवकरच जारी होईल अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केली आहे.
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जावर लागणारी व्याज महामंडळाने भरावी अशी मागणी मराठा समाज बांधवांकडून करण्यात येत होती या मागणीची दखल घेऊन महामंडळाच्या बोर्ड बैठकीत मराठा विद्यार्थ्यांसाठी 40 लाख रुपयांपर्यंतच्या शैक्षणिक कर्जावर व्याज परतावा देण्याचा निर्णय लवकरच शासनाकडून जाहीर करण्यात येणार आहे.
अधिक माहिती पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.